नवी दिल्ली : केंद्र व राज्य सरकारच्या रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी यांच्यासह देशात ५४८ आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. केंद्र सरकारने गोळा केलेल्या माहितीच्या आधारे हा आकडा देण्यात आला आहे. यात प्रत्यक्ष आरोग्य तपासणी करणारे कर्मचारी, वॉर्ड बॉय, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, शिपाई, स्वयंपाक कर्मचारी यांच्या माहितीचा समावेश नाही.
दरम्यान, एबीपी माझाने दिलेल्या बातमीनुसार, संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या योद्ध्यांमध्येच संसर्ग वाढल्याचं चिंताजनक बाब समोर आली आहे. महाराष्ट्रातील तब्बल 531 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 51 अधिकारी आणि 480 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर कर्तव्य बजावणाऱ्या पाच पोलिसांनी प्राण गमावले आहेत.
रामदास आठवलेंवर तात्काळ गुन्हा दाखल करा अन्यथा…
सद्यस्थितीत 43 अधिकारी आणि 444 कर्मचारी कोरोनासंक्रमित आहेत. तर आतापर्यंत 39 जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये आठ अधिकारी आणि कर्मचारी आहेत. तर मुंबईतील तीन तसंच पुणे आणि सोलापूरमधील प्रत्येकी एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन सुरुच
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
