औरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये करोना रुग्ण संख्याची संख्येत मागील काही दिवसांत झपाट्याने वाढ झाली असताना आज, शहरात 28 नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. परिणामी शहारतील करोनाबाधितांची एकूण संख्या 349 वर पोहचली आहे.
दरम्यान, दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यातील कोरोनाचे चार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाला पराभूत करणाऱ्या रुग्णांना आज घरी सोडण्यात येणार आहे. चारही शहरातील रुग्ण जिल्ह्याधिकाऱ्यांच्या उपस्थतीतीत रुग्णांना घरी सोडण्यात येणार आहे.
दरम्यान, देशात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची गती स्थिर असली तरी, वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय असल्याचं मत दिल्लीतल्या एम्सचे संचालक रणदीप गुलेरीया यांनी व्यक्त केलं आहे. अनेक तज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार भारत मे महिन्याच्या अखेरीस किंवा जुनच्या मध्यात रुग्णांच्या संख्येच्या सर्वोच्च टप्प्यापर्यंत जाऊ शकतो अशी शक्यता त्यांनी वर्तवली. ही बाब लक्षात घेऊन आपण अधिक सतर्क राहत रुग्ण संख्या कमी व्हावी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
