मुंबई : संपूर्ण जगावर देशावर कोरोणाच संकट आल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून भारतामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यामुळे ग्रामीण भागामध्ये मोलमजुरी करणाऱ्या शेतकर्यांना कष्टकर्यांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. कुटुंबाची दोन वेळची जेवणाची पंचायत झाल्यामुळे अनेक लोक त्रस्त होते.
याच पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावामधील युवकांनी अशा लोकांच्या भावना समजून त्यांना मदत कार्य करण्याचे ठरवले. वैयक्तिक निधीतून जवळपास वाल्हे गावातील पाचशेहून अधिक कुटुंबांना किराणासह फळभाज्या व पालेभाज्या पुरवल्या असल्याची माहिती युवा नेते सागर भुजबळ यांनी दिली.
तसेच हेच मदत कार्य कोणतीही जाहिरातबाजी न करता अशाच पद्धतीने अविरत चालू ठेवणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. या कामामध्ये त्यांच्यासोबत गावातील स्वप्निल सासवडे, अक्षय खुडे, सचिन भुजबळ, सागर बारवकर, सुदन भुजबळ, दिपक भुजबळ, तेजस पवार, अनिकेत गायकवाड, शंतनु नवले, रोहित भोसले हे युवक देखील मदत कार्य करत आहेत.
‘ग्रामीण भागामध्ये मोलमजुरी करणारा कष्टकरी शेतकरी अडचणीत आहे त्याला अशा प्रसंगांमध्ये मदत करणे हे आपले सर्वांचेच सामाजिक कर्तव्य आहे. यामुळे प्रत्येक युवकाने आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढी मदत करणे या काळामध्ये गरजेचे आहे’ अशी भावना यावेळी सागर भुजबळ यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना व्यक्त केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
