मुंबई : ‘आपण कायमच राज्यघटनेच्या तत्त्वाशी निगडित असा काँग्रेसचा विचार जपला आहे. आणि तो शाश्वत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार अतिशय चांगले काम करत आहे,’ असं कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
ते प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित छत्रपती यूथ फेस्टिवलमध्ये महाराष्ट्र दिनी महसूलमंत्री थोरात यांनी शुक्रवारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंंगद्वारे साधला संवाद साधला.
यावेळी थोरात म्हणाले, ‘ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वागण्यातील सहजता, सर्वांना समावून घेण्याची कार्यपध्दती तसेच कोणतेही राजकीय डावपेच न वापरता त्यांनी घेतलेले विकासाचे निर्णय यामुळे ते लोकप्रिय आणि यशस्वी ठरत आहेत.
दरम्यान, ‘कोरोनामुळे राज्यात अनेक दिवस लॉकडाऊन असताना जनतेने केलेले सहकार्य मोलाचे असून प्रशासन सरकार व कोरोना वॉरियर्स यांचे काम कौतुकास्पद राहिले आहे,’ असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

