Share

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज (1 मे) महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६० वर्ष पूर्ण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र राज्याच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

तसेच मुख्यमंत्री ठाकरे हे स्वतः वाहन चालवीत हुतात्मा स्मारक व मंत्रालयातल्या कार्यक्रमासाठी पोहोचले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन करत अत्यंत साधेपणाने महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.

याचप्रमाणे यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस महासंचालक तसेच वरिष्ठ शासकीय आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्प वाहून अभिवादन केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!