Share

चीनमधून बाहेर पडून आमच्या राज्यात या, विदेशी कंपन्यांसाठी योगींनी लावली फिल्डिंग

Published On: 

नवी दिल्ली : कोरोनाने जगभरात हातपाय पसरले आहेत. अनेक देश कोरोनाच्या प्रसारामुळे आर्थिक डबघाईला आले आहेत. जगभरात कोरोनाचा प्रसार केल्याचा आरोप आता चीनवर होत असून अनेक देश चीनला अद्दल घडविण्याचा विचार करत आहे.

चीनची आर्थिक नाकेबंदी करण्याचा प्लान अनेक देश आखत आहेत. याचाच एक भाग म्हणून अनेक देश चीनमधून आपल्या कंपन्या चीनमधून इतर देशांमध्ये हलविण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. यातील बऱ्याच कंपन्या भारत हा आता अधिक चांगला आणि जवळचा देश वाटू लागला आहे.

दरम्यान,चीनमधून काढता पाय घेऊ इच्छिणाऱ्या अमेरिकी कंपन्यांसाठी उत्तर प्रदेश सरकारनं मोर्चेबांधणी सुरु केल्याचं दिसत आहे. जे आपला बेस आणि कंपन्या उत्तर प्रदेशमध्ये आणू इच्छित आहेत त्यांच्यासाठी राज्यात अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असा प्रस्ताव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कंपन्यांसमोर ठेवला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या कंपन्या चीनमधून बाहेर पडू इच्छित आहेत त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न करण्याच्या सुचना राज्यांना दिल्या होत्या. आता आदित्यनाथ याच संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आदित्यनाथ ज्या कंपन्यांसाठी फिल्डिंग लावत आहेत त्यात फेडएक्स, युपीएस, सीस्को, अडोबस लॉकहिड मार्टिन, हनिलेल, बोस्टन सायंटिफिक अशा कंपन्यांचा समावेश आहे.

इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारनं यासाठी अमेरिकेतील १०० गुंतवणुकदार आणि कंपन्यांच्या प्रमुखांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली ज्यात योगी आदित्यनाथ यांनी कंपन्यांसमोर हा प्रस्ताव ठेवला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!