Share

पुणे विभागात ३९ हजार ७३४ स्थलांतरित मजुरांची सोय ; तर तब्बल १ लाख १२ हजार १९० मजुरांना भोजन – डॉ. दीपक म्हैसेकर

Published On: 

🕒 1 min read

पुणे :- सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत १५४ कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत ३९९ कॅम्प असे पुणे विभागात एकुण ५५३ रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये ३९ हजार ७३४ स्थलांतरित मजूर असून १ लाख १२ हजार १९० मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागात ४० हजार ५२१ क्विंटल अन्नधान्याची तर १२ हजार ९०४ क्विंटल भाजीपाल्याची आवक देखील झाली असल्याचे कळते आहे.

सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे ४० हजार ५२१ क्विंटल अन्नधान्याची तर १२ हजार ९०४ क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात १ हजार ८०५ क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक २३ हजार ६१९ क्विंटल इतकी झाली आहे.

पुणे विभागात २६ एप्रिल २०२० रोजी ९८.७७४ लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून २४.२२१ लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे,असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!