सातारा : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने नाशिकमध्ये जनजीवन विसकळीत झाल्याचे चित्र आहे.कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी प्रतिबंध घातले असताना सातारा क्लबमध्ये मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली मिळाल्याचे पहायला मिळाले आहे.
सातारा क्लब नेहमी प्रमाणे सुरु असल्याचे पहायला मिळाले.या क्लब मध्ये परदेशातून साताऱ्यात आलेले काही सातारकर या क्लबमध्ये उपस्थिती लावत असल्याने जिल्हा प्रशासनाने लावुन दिलेले सर्व नियम धाब्यावर बसविले जात असल्याचे चित्र आहे.
जिल्हयातील क्रीडांगणे,जलतरण तलाव,बास्केट बॉल इत्यादी सार्वजनिक ठिकाणे पुढील आदेश येईपर्यंत बंद राहतील असा आदेश असताना सातारा क्लब सुरू असल्याने या क्लबवर प्रशासन नेमकी कोणती कारवाई करणार याकडे सर्वाचे लक्ष लागुन राहिले आहे. सामान्यांना वेगळा कायदा आणि श्रीमंतांना वेगळा कायदा हे आता पाहावे लागेल.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

