टीम महाराष्ट्र देशा : येत्या २६ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून भारतीय जनात पक्षातर्फे सहयोगी पक्षाचे सदस्य असणारे रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे. आठवलेंनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्ज दाखल करते वेळी आठवलेंनी संपत्तीचे विवरण दाखल केले आहे.त्यात आठवलेंकडे १,६४,१३,१०१ रक्कम खात्यावर दाखवली आहे.तर पत्नी सीमा आठवले यांच्या कडे ३७,६६,७९२ रक्कम आहे.
एकूण स्थावर मालमत्तेचा विचार केला तर आठवलेंच्या नावे ७३,६२,६०० रुपयाची संपत्ती आहे तर पत्नी सीमा यांच्या नावे ३,८९,८३,१२८ रुपये किमतीची स्थावर मालमत्ता आहे.एकंदरीतच या सगळ्या संपत्तीचा विचार केला तर आठवले यांच्याकडे फक्त शब्दांची संपत्ती नाही तर पैशाची संपत्ती सुद्धा खुपच आहे.
भाजपाने महाराष्ट्राबरोबरच राज्यसभेच्या इतर राज्यातील उमेदवारांची घोषणाही केली आहे. त्यामध्ये मध्य प्रदेशमधून ज्योतिरादित्य शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अन्य उमेदवारांमध्ये आसाममधून भुवनेश्वर कालिता, बिहारमधून विवेक ठाकूर, गुजरातमधून अभय भारद्वाज आणि रमिलाबेन बारा, झारखंडमधून दीपक प्रकाश, मणिपूरमधून लिएसेंबा महाराजा, राजस्थानमधून राजेंद्र गहलोत यांचा समावेश आहे. त्याबरोबरच आसाममधून मित्रपक्ष बीपीएच्या बुस्वजित डाइमरी यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे.
हेही पहा:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
