Share

”विठ्ठल” माझा श्रीमंत ! माघी यात्रेनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी तीन कोटींचे दान

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: नुकत्याच पार पडलेल्या माघी यात्रेच्या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी तीन कोटींचे दान जमा झाले असून मागील वर्षापेक्षा यामध्ये एक कोटी ३१ लाख ६८ हजार रुपयाने वाढ झाली आहे.एकंदरीतच भाविकांनी विठ्ठलाच्या चरणी प्रचंड पैश्याचा भार टाकला आहे.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या मार्फत माघ यात्रा २०२० मध्ये जवळपास तीन लाखाहून अधिक भाविकांनी विठल – रुख्मिणीचे दर्शन घेतले.

या संपूर्ण कालावधीत एकूणच भाविकांकडून प्राप्त होणाऱ्या निरनिराळ्या देणगी रक्कमा व अन्य मार्गाने समितीस एकूण २ कोटी ९० लाख २६ हजार ५७९ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.देणगी उत्पन्नामध्ये श्री विठ्ठलाच्या चरणावर १९ लाख २२ हजार २०७ रुपये, श्री रुक्मिणी मातेच्या चरणावर ५ लाख ५८ हजार ३०२ रुपये, अन्नछत्र देणगी २ लाख ११ हजार ४७६, पावती स्वरुपातील देणगी ५० लाख ७२५ रुपये, बुंदी लाडू प्रसाद विक्री ३५ लाख ९९ हजार १३० रुपये, राजगिरा लाडू विक्री ३ लाख ५८ हजार रुपये, फोटो विक्री ६६ हजार १२५ रुपये, भक्तनिवास, वेदांन्ता, व्हिडीओकॉन, श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास २२ लाख २८ हजार ४८० रुपये, नित्यपूजा १ लाख ३६ हजार रुपये, हुंडी पेटीमध्ये जमा ७४ लाख ७४ हजार ८०९ रुपये, परिवार देवता १४ लाक ९६ हजार १७४ रुपये, ऑनलाईन देणगी १७ लाख ३१ हजार ३२२ रुपये व अन्य स्वरुपात ४२ लाख ४३ हजार ८२९ रुपयांचा समावेश आहे.विशेष म्हणजे यामध्ये परदेशी चलनाचा समावेश आहे.

गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी मंदिर समितीच्या उत्पन्नात १ कोटी ३१ लाख ६८ हजार ६८८ रुपयांची वाढ झाली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.संसाराचा भर वाहणारा विठ्ठल आता पैशाचा भारही वाहतो आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!