टीम महाराष्ट्र देश: उद्धव ठाकरे सरकारची महत्त्वाकांक्षी ‘शिवभोजन’ थाळी योजना येत्या २६ जानेवारी रोजी होणार आहे. मात्र त्यापूर्वी ही योजना फसवी असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.तर शिवथाळी सुरु होण्याआधीच विरोधकांची पोटं दुखायला लागली आहेत, असा टोला आमदार हेमंत टकले यांनी विरोधकांना लगावला आहे .
भाजपच्या या आरोपाला आता राष्ट्रवादीकडून आमदार हेमंत टाकले यांनी व्हिडीओ शेअर करून उत्तर दिले आहे.दहा रुपयात शिवभोजन थाळी योजनेचा लाभ हा गरिबांना होणार आहे. ही योजना यशस्वी होईल किंवा नाही हा पुढचा भाग आहे.
मात्र असे असताना विरोधक आधीच ही योजना फसवी असल्याच्या भविष्यवाणी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हेमंत टकले यांनी केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
