Share

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आता ‘मिशन दिल्ली’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेसोबत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केल्यानंतर आता ‘मिशन दिल्ली’ सुरु केले आहे.दिल्लीत येत्या ८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि ११ तारखेला मतमोजणी होणार आहे.

याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने दिल्लीतल्या ७ विधानसभा मतदार संघात उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

या यादीत खालील उमेदवारांचा समावेश आहे.
१)दिल्ली गेट-कमांडो सुरेंद्र सिंग
२)गोकुळनगर-फतेह सिंघ चौधरी
३)बाबरपूर-जाहिद अली
४)गोंडा-प्रशांत सिंग
५)छतरपूर-राणा सुजित सिंग
६)मुस्तफाबाद-मयूर भान
७)चांदणी चौक-असीम बेग

या उमेदवारांची पहिली यादी राष्ट्रवादीने जाहीर केली आहे.दिल्लीत विधासभेच्या एकूण ७० जागा आहेंत.त्यापैकी ३६जागा मिळवणाऱ्या पक्षाला दिल्लीत सत्ता स्थापन करता येते.त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!