Share

नागराज मंजुळेच्या ‘झुंड’ची पहिली झलक पाहिली का ?

Published On: 

🕒 1 min read

पुणे : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या पहिल्या हिंदी आणि अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘झुंड’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचा अतिशय दमदार असे हे पहिले पोस्टर कलाविश्वात अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

हे पोस्टर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये पाठमोरे उभे असलेले अमिताभ बच्चन दिसत आहेत. ते एका झोपडपट्टीसमोर उभे राहून कसला तरी विचार करताना दिसत आहेत.

नागराज पोपटराव मंजुळे असं नाव चित्रपटाच्या पोस्टवर लिहिण्यात आलं आहे. ज्यामवर मध्यभागी अमिताभ बच्चन हे पाठमोरे उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे ही दोन तगडी नावं या चित्रपटाशी जोडली गेल्यामुळे आता प्रेक्षक आणि एकंदरच कलाविश्वाच्या अपेक्षा उंचावल्या असणार यात वाद नाही.

‘झुंड’ सिनेमात अमिताभ बच्चन फूटबॉल प्रशिक्षण विजय बरसे यांची भूमिका साकारत आहेत. विजय बरसे हे झोपडपट्टीतील तरुणांना फूटबॉलचे प्रशिक्षण देतात. त्यांचा जीवनपट रूपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. झोपडपट्टीमध्ये राहणारा अखिलेश कसा मोठा फुटबॉलपटू बनतो ही कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!