🕒 1 min read
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात फक्त तीन महिला आमदारांना संधी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळात वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर आणि आदिती तटकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेसकडून वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर यांना कॅबिनेटमंत्रिपद देण्यात आलं आहे. तर राष्ट्रवादीनं आदिती तटकरे यांच्याकडे राज्यमंत्रिपद सोपावलं आहे. शिवसेनेकडून एकाही महिला आमदाराला मंत्रिपद दिलं नाही.
वर्षा गायकवाड -काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गायकवाड यांना शपथ दिली.वर्षा गायकवाड ह्या २००४ पासून कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व करीत आहेत. मुंबईतल्या धारावी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांना वडील एकनाथ गायकवाड यांच्या राजकारणाचा वारसा आहे. २००४ पासून त्या महाराष्ट्र विधानसभेत सतत निवडून येत आहेत. ही त्यांची पाचवी ‘टर्म ‘आहे. २०१० ते२०१४ या काळात त्यांनी महिला व बालकल्याण विकास मंत्रालयात उत्तम कामगिरी केली आहे.
आदिती तटकरे – राष्ट्रवादीकडून रायगडच्या आणि खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांना मंत्रिमंडळात संधी दिली आहे. वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळात संधी देण्यात आलीय तर, राष्ट्रवादी काँग्रेसने आदिती तटकरे यांना राज्यमंत्रिपदी संधी दिली. आदिती तटकरे पहिल्यांदाच आमदार झाल्या असल्याने राष्ट्रवादीने त्यांना राज्यमंत्रिपदाची संधी दिली आहे.
यशोमती ठाकूर – तिवसा (अमरावती)- तिवसा मतदारसंघात गेल्या तीन पंचवार्षिकपासून ऍड. आमदार यशोमती ठाकूर निवडून येत आहेत. त्यांना वडील व माजी आमदार कै. भय्यासाहेब ठाकूर यांच्यापासूनच राजकीय वारसा मिळाला. यशोमती ठाकूर यांना 2004 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्यानंतर सलग तीनदा त्या विजयी झाल्या. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

