Share

ग्रहण पाहताना नेहमी ‘ही’ घ्या काळजी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : वर्ष २०१९ मधील सर्वात शेवटच सुर्यग्रहण हे तुम्हाला उद्या (२६ डिसेंबर) पाहायला मिळणार आहे. २६ डिसेंबर रोजी कंकणाकृती सुर्यग्रहण आहे. यंदाच्या सुर्यग्रहणादरम्यान लाल अंगठीचा आकार पाहता येणार आहे. चंद्र ग्रहण किंवा सूर्य ग्रहण पहावयाचे असल्यास अनेक सूचना दिल्या जातात. ग्रहणाच्या दिवशी काय करावे, किंवा काय करू नये, या संदर्भात आपल्याकडे निरनिराळे नियम आहेत. तसेच ग्रहण पाहताना त्यामुळे शरीराला कश्या प्रकारे हानी होऊ शकते या बदल पण बोले जाते.

ग्रहण पाहण्याआधी ते केवळ डोळ्यांनी पाहू नये. सूर्य ग्रहणाच्या दरम्यान वातावरणात उत्पन्न होणाऱ्या सोलार रेडीयेशन्स मुळे डोळ्यांच्या नाजूक टिश्यूचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे दृष्टी कमी होण्याची शक्यता असते. सूर्य ग्रहण पाहताना डोळ्यांच्या सुरक्षेसाठी आवरण चढविणे गरजेचे आहे. विशिष्ट प्रकारचे सोलर फिल्टर असणारा गडद रंगाचा गॉगल ग्रहण पाहताना घालावा, किंवा एखाद्या जुन्या एक्स-रे फिल्म मधून सूर्य ग्रहण पाहावे.

सुर्यग्रहणाचे प्रतिबिंब पाण्यात पाहू नये. तसेच काजळी धरलेल्या काचेतून सुर्यग्रहण पाहू नये.नुसत्या डोळ्यांनी पाहू नये, यामुळे आपल्या डोळ्यांना इजा होऊ शकते. पण सुर्यग्रहण पाहताना कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही. ग्रहण सुरक्षित पद्धतीने पाहिले तर कोणतीही इजा होत नाही. ग्रहण पहायच असेल तर आता बाजारात सुर्यग्रहण पाहण्यासाठी चष्मे उपलब्ध झाले आहेत. हे विशिष्ट प्रकारचे ग्रहणाचे चष्मे आहेत.

आपल्याकडे पूर्वीपासून काही नियम चालत आले आहेत. गर्भारशी महिला, आजारी व्यक्ती, वयस्क व्यक्ती आणि अगदी लहान मुले यांनी ग्रहण पाहू नये असे म्हटले जाते. ग्रहणाच्या काळामध्ये अन्नग्रहण करू नये, ग्रहणाच्या कालमध्ये वातावरणामध्ये घातक रेडीयेशन उत्पन्न होत असतात. ह्या रेडीटेशनचे परिणाम आपण खात असलेल्या अनावर होण्याची शक्यता असल्याने या काळामध्ये अन्न ग्रहण करू नये असे म्हटले जाते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!