🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांविरोधात औरंगाबाद खंडपीठात एकूण सोळा निवडणूक याचिका दाखल झाल्या आहेत. जळगाव येथील आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे यांच्याविरुद्ध जगदीशचंद्र रमेश वाळवी यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे. लातूर येथील आमदार अभिमन्यू दत्तात्रय पवार यांच्याविरुद्ध बजरंग भुजंगराव जाधव यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे.
उस्मानाबाद येथील आमदार तानाजी जयवंत सावंत यांच्याविरुद्ध राहुल मोटे यांनी, औरंगाबाद येथील आमदार प्रशांत बंब यांच्याविरुद्ध अभिजित जयप्रकाश अधिकारी यांनी याचिका दाखल केली आहे. नांदेड येथील आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्याविरुद्ध शिवकुमार नारंगळे, नांदेड येथील आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्याविरुद्ध मुक्तेश्वर धोंडगे, औरंगाबाद येथील आमदार संजय शिरसाट यांच्याविरुद्ध रमेश गायकवाड, तर नांदेड येथील आमदार राजेश पवार यांच्याविरुद्ध दिगंबर रामलोद यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे; तसेच नगर येथील आमदार ज्ञानदेव सुपेकर यांच्याविरुद्ध रामदास शिंदे यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे. शिवाय सुपेकर यांच्याविरुद्ध रोहित पवार यांनी याचिका दाखल केली आहे. धुळे येथील आमदार शाह फारूक अन्वर यांच्याविरुद्ध अनिल गोटे, रमेश दाणे यांनीही निवडणूक याचिका दाखल केली आहे. परभणी येथील आमदार मेघना बोर्डीकर यांच्याविरुद्ध विजय भांबळे यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे.
माजी मुख्यमंत्री व नांदेड येथील आमदार अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध शेख एजाज शेख महेबूब यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे. तर नांदेड येथील आमदार भीमराव केराम यांच्याविरुद्ध प्रदीप जाधव यांनी याचिका दाखल केली आहे; तसेच नगर येथील आमदार बबनराव पाचपुते यांच्याविरुद्ध घनश्याम शेलार यांनी याचिका दाखल केली आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1205788331771973632?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1205788221969272833?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
