Share

पद्मभूषण पुरस्कारासाठी शटलक्वीनच्या नावाची शिफारस

Published On: 

वेब टीम:आपल्या जिगरबाज खेळीने भारतीयांची मने जिंकणारी भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिच्या नावाची शिफारस पद्मभूषण पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. याआधी मार्च २०१५ मध्ये सिंधूला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.यंदाच्या हंगामात सिंधूने शानदार कामगिरी करत अनेक महत्त्वाच्या स्पर्धा गाजवल्या आहेत.

कोरियन ओपनच्या जेतेपदावर नाव कोरणाऱ्या पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र या सामन्यात पराभव पत्कराव्या लागल्याने सिंधूचे अजिंक्यपद थोडक्यात हुकले. २२ वर्षांची सिंधू सध्या चांगल्या फॉर्मात असून तिने कोरियन ओपनसोबतच इंडिया ओपन सुपर सिरीज आणि सईद मोदी इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशीप या स्पर्धांची विजेतेपदे पटकावली आहेत. जागतिक क्रमवारीत सिंधू सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये तिने रौप्यपदकाची कमाई केली होती. याआधी कोणत्याही भारतीय बॅडमिंटनपटूला ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावता आलेले नाही.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!