🕒 1 min read
रायगड : निसर्ग या चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं आहे. या नुकसानाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज आणि उद्या कोकण दौऱ्यावर आहेत. काजू, फोफळी, आंबा, आणि नारळाच्या बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे या भागातील नुकसानग्रस्तांकडून मदतीची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर येथील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत.
राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्के आहे – आरोग्यमंत्री राजेश टोपे
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून आढावा घेतला जात असून पाहणीसाठी कोकण दौऱ्यावर पोहोचले आहेत. शरद पवार यांनी सर्वात आधी रायगड येथील माणगाव येथे पोहोचून परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आणि पालकमंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या. यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून शरद पवारांना परिस्थिती जाणून घेतली.
शरद पवार दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. ९ जूनला रायगड आणि १० जून रत्नागिरी जिल्ह्यातील भागाची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत.
पुण्यातील झोपडपट्टी, जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर लक्ष केंद्रीत करा – केंद्रीय पथक
शरद पवार आज माणगाव, म्हसळा, दिवेआगार, श्रीवर्धन येथील दौरा केल्यानंतर ४ वाजता श्रीवर्धन येथे आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता हरिहरेश्वर आणि नंतर ६ वाजता बागमांडला मार्गे दापोलीकडे रवाना होणार आहेत. दरम्यान, शरद पवार यांनी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या म्हसळा येथील एका मदरशाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. @PawarSpeaks साहेब यांच्या आजपासून सुरू झालेल्या रायगड-रत्नागिरीच्या दौऱ्यादरम्यान चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या #म्हसळा येथील एका मदरशाला भेट दिली.@NCPspeaks @iAditiTatkare @ATatkare pic.twitter.com/IPAyA8bJoz
— Sunil Tatkare (@SunilTatkare) June 9, 2020
दरम्यान, हा दौरा आटोपताच ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन कश्याप्रकारे मदत करता येईल यावर निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 5 जून रोजी कोकणच्या नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे मुंबईला परत येताच त्यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली होती.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
