नवी मुंबई : ‘शरद पवार यांना राजकारणात ५५ वर्षे झाली. त्यातली २५ वर्ष सत्तेत गेली, तर २५ वर्ष विरोधात गेली. या ५५ वर्षात महाराष्ट्रातील जनतेने शरद पवारांना कधी अंतर दिलं नाही. ही गोष्ट राष्ट्रवादी पक्षातील सर्वांनी कुटुंब म्हणून लक्षात ठेवली पाहिजे. सत्ता येते आणि जाते, सत्ता ही सेवा करण्यासाठी असते, ती पदासाठी नसते, ना लालदिव्यासाठी असते हे लक्षात ठेवा,’ असं आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय.
आगामी नवी मुंबई महानगरपालिकेत सत्ता परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा दावा देखील त्यांनी केला आहे. त्या नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार फटकेबाजी केली आहे. ‘५२ लोक शरद पवारांना सोडून गेले, एकही आमदार झाला नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास’ असल्याचे सुळे यांनी म्हंटलय.
‘पक्षात दीड वर्षांपूर्वी कोण टिकेल, कोण लढेल आणि कोण लढणार नाही, अशी परिस्थिती होती. रोज उठून आज कोण पक्षातून गेला याची चिंता असायची आणि कोण पक्ष सोडून गेला नाही की बरं वाटायचं. ५२ लोक शरद पवारांना सोडून गेले होते. त्यातील एकही आमदार म्हणून निवडून आला नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे,’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- परभणीमध्ये विनामास्क फिरणाऱ्या ५४ जणांना १० हजार ८०० रुपयांचा दंड
- छत्रपती शिवाजी महाराजांना राज ठाकरेंची खास शैलीत शिववंदना !
- वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा उघडत आहेत कोविड सेंटर्सचे दार
- एका माळेचे मणी : नेतेच कोरोनाचे नियम पाळत नसतील तर सर्वसामान्य लोकांनी तरी ते का पाळावेत?
- वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा उघडत आहेत कोविड सेंटर्सचे दार


