Share

‘५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे आता बंधनकारक’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून आपण कोविडशी मुकाबला करीत आहोत. अजूनही कोविडची तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजनची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. हे लक्षात घेता येणाऱ्या काळात 50 खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे बंधनकारक करण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज सांगितले.

मिड-डे राऊंड टेबल सेमिनार आज ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आला होती. या सेमिनारमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्यासह मिड डे वृत्तपत्राची संपादकीय टीम उपस्थित होती. यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की, ‘कोविड रुग्णांची संख्या आटोक्यात जरी येत असली तरी कोविड रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत असते. त्यामुळे येणाऱ्या काळात रुग्णालयांनी स्वत: ऑक्सिजन निर्मिती प्लांट निर्माण करणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र गेल्या दीड वर्षापासून कोविड परिस्थितीशी समर्थपणे मुकाबला करीत आहे. या काळात कोविडच्या चाचण्या करण्यासाठी शासकीय प्रयोगशाळा उभारणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविड रुग्णालय तयार करणे, आवश्यक ती साधनसामुग्री निर्माण करणे, ऑक्सिजनची उपलब्धता निर्माण करणे यासारख्या अनेक उपाययोजना याकाळात करण्यात आल्या. महाराष्ट्रावरील संकट अजूनही पूर्णपणे संपलेले नसून अजूनही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्यात आवश्यक त्या उपाययोजना आणि खबरदारी घेण्यात येत आहे.

आपले दैनंदिन जीवन पूर्ववत होण्यासाठी राज्य शासनाच्या या सर्व प्रयत्नात सर्वसामान्यांची साथ असणे तितकेच आवश्यक आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पोस्ट कोविड सेंटर सुरु करण्यात आली आहेत.’ अशी माहितीही यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!