🕒 1 min read
सोलापूर : सुरवातीला एकही कोरोनाबाधित नसलेल्या सोलापूरमध्ये आता कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. तर आता प्रसूती दरम्यान कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या 10 डॉक्टरांसह 47 जणांना क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे. ही घटना सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील पेनूर गावात घडली आहे.
घडले असे की, महिलेला प्रसुतीसाठी पंढरपुरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या दहा डॉक्टरसह इतर वैद्यकीय स्टाफमधील 47 जणांना क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे. तर तिच्या बाळाला तपासणीसाठी सोलापुरात हलवण्यात आलं आहे.
यानंतर प्रशासनाने ती महिला पंढपुरातील हॉस्पिटलमधील ज्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आली, अशा 47 जणांना क्वॉरन्टाईन केलं आहे. यामध्ये 10 डॉक्टरांसह 37 इतर वैद्यकीय स्टाफमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सगळ्यांना आता तपासणीसाठी सोलापुरात पाठवले जाणार आहे.
याशिवाय पेनूर गावातील तिच्या गावातील 15 जणांना तपासणीसाठी सोलापुरात दाखल केलं जाणार आहे. तसंच या महिलेच्या नवजात बाळाला रात्री उशिरा सोलापुरात हलवण्यात आलं आहे. सध्या पंढरपुरातील हे नामांकित हॉस्पिटल सील केले असून पेनूर गावही सील करण्यात आलं आहे.
दरम्यान सोलापुरातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 61 आहे. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 56 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु असून यातील 54 सोलापूर शहरातील तर दोन जण ग्रामीण म्हणजेच सांगोला आणि मोहोळ तालुक्यातील आहेत.
नाही तर लॉक डाऊन तोडून ठाण्यात दाखल होणार : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान | Shree Shivpratishthan |
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
