Share

पुणे विभागातील 463 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी,कोरोना बाधित 2 हजार 147 रुग्ण

Published On: 

पुणे :  पुणे विभागातील 463 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 147 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 571 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 113 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 72 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विभागात 2 हजार 147 बाधित रुग्ण असून 113 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 1 हजार 912 बाधीत रुग्ण असून 103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 74 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 114 बाधीत रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 33 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 14 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 22 हजार 604 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 21 हजार 446 चा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 125 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 19 हजार 266 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 2 हजार 147 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील 71 लाख 46 हजार 385 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 79 लाख 84 हजार 598 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 624 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!