लखनऊ : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडल्याच्या आरोपात आणखी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. भाजपा नेते सुमित जयस्वाल यांच्यासह इतरांचा अटकेत समावेश आहे. याप्रकरणी भाजपा नेत्यांनी अज्ञात शेतकऱ्यांविरोधात मणुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमित जयस्वाल, शिशुपाल, नंदन सिंह बिष्ट आणि सत्य प्रकाश त्रिपाठी यांना लखीमपूर खेरी पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. लखीमपूर खेरी या ठिकाणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडले.
या घटनेत आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर याठिकाणी प्रशासनाने १४४ कलम लागू केले होते. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांना त्या ठिकाणी जाण्यापासून अटकाव करण्यात आल्याने देशभरात राजकारण तापले होते. आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतांवर अंतिम संस्कार करण्यात येणार नाही असा पवित्राही शेतकऱ्यांनी घेतला होता.
महत्वाच्या बातम्या
- ‘ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री नाकारले’
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- ‘रवी राणांनी जे केलंय ते चिल्लरगिरी, स्वतःला शेतकऱ्यांचं कैवारी समजतात आणि पदोपदी नौटंकी’

