Share

धक्कादायक बातमी ! औरंगाबादेत कोरोनाचा तिसरा बळी ; चिंता वाढली

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : औरंगाबादमध्ये कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे. या 65 वर्षीय महिलेचा परवा (गुरुवारी) कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तिला उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले होते. त्यावेळीच या महिलेची प्रकृती गंभीर होती.

दरम्यान, घाटी रुग्णालयात सकाळी सहा वाजून ५० मिनिटांनी महिलेचे निधन झाले. ही महिला बिस्मिल्ला कॉलनीमध्ये राहत होती. सुरुवातीला एका खाजगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर १३ तारखेला त्यांना घाटीत भरती करण्यात आले होते. या महिलेला रक्तदाब, मधुमेह व किडीणीचा आजार होता.

त्यामुळे या महिलेची सुरुवातीपासून या प्रकृती गंभीर होती. वैद्यकीय विभागाच्या अथक प्रयत्ना नंतरही आज या महिलेचा मृत्यू झाला. यासह शहरातील २८ कोरोना रुग्णांपैकी हा तिसरा बळी आहे. या व्यतिरिक्त उर्वरित २३ कोरोना बाधित रुंगणांवर जिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. व २ रुग्ण कोरोनाच्या या संकटातून मुक्त झाले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!