Share

धक्कादायक : मुंबईतील 3000 रुग्णवाहिका अचानक गायब झाल्या ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईमध्ये करोनाचा विळखा घट्ट होऊ लागला असून करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.शहरातील झोपडपट्टय़ा आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये करोनाचा प्रसार वेगाने होऊ लागल्याने संसर्गाची साखळी तोडण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न अपुरे ठरत असल्याचं सध्या चित्र आहे.

आतापर्यंत मर्यादित रुग्णसंख्या असलेल्या मुलुंड, घाटकोपर, भांडुप परिसरात रुग्णदुपटीचा कालावधी कमी झाल्याचे, तर भायखळा, अंधेरी पश्चिम, ग्रॅन्ट रोड, एल्फिन्स्टन परिसरात रुग्णदुपटीचा कालावधी हळूहळू वाढल्याचे निदर्शनास आले आहे.१८ मेपर्यंत दहिसरमध्ये सर्वात कमी म्हणजे १६०, सॅण्डहस्र्ट रोडमध्ये २८१, मुलुंडमध्ये ३०८, गोरेगावमध्ये ४०६, भांडुपमध्ये ५५५, घाटकोपरमध्ये ५७२ रुग्ण आढळून आले होते. कमी रुग्णसंख्या असली तरी या भागातील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी कमी झाल्यामुळे पालिका अधिकारी चिंतित झाले आहेत.

एका बाजूला ही परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला कोरोना माहामारीच्या या भयंकर संकटात मुंबईतील रुग्णांना रुग्णवाहिकेसाठी 5-15 तास मोजावे लागत आहेत. 20 मार्चपर्यंत मुंबई आरटीओकडे रजिस्टर असलेल्या 2920 खाजगी एमब्युलन्सेस सेवा देत होत्या पण गेल्या दोन महिन्यांपासून अचानक गायब झाल्या आहेत असा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे.

दरम्यान, याबाबात 5 एप्रिल 2020 ला आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवले होते. मात्र अद्यापही पेशंटला यासाठी झगडावे लागत आहे. दीड महिन्यानंतरही राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली नाही. मेडिकल इमर्जन्सी अंतर्गत ठाकरे सरकारने खाजगी एम्ब्युलन्सच्या मालकांवर का कारवाई करत नाही असा संतप्त सवाल देखील किरीट सोमैया यांनी उपस्थित केला आहे.

108 क्रमाकांच्या सेवेवर निव्वळ 93 रुग्णवाहिका सध्या कार्यरत आहे. देशात आणि राज्यात असलेल्या मेडिकल इमर्जन्सी अंतर्गत महापालिका आणि राज्य सरकारने ब-यापैकी आपला वापर केला आहे.. मग खाजगी रुग्णवाहिका मालिकांवर कारवाई का नाही याबाबत स्पष्टता असायला हवी असं त्यांनी म्हटलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!