🕒 1 min read
लातूर:- स्वर्गीय विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 26 एप्रिल 2020 रोजी उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथील 26 व्यक्ती, चाकुर येथील 1 व्यक्ती व या संस्थेतील 7 असे एकुण 34 कोरोना (कोविड 19) संशयित व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली होती.
त्यापैकी या संस्थेतील 7 व चाकुर येथील एका व्यक्तीचा अहवाल निगेटीव्ह आला असुन उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथील 18 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत व 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन 2 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले असल्यामुळे या दोन व्यक्तींचे 48 तासानंतर स्वॅब घेवून पुनर्तपासणी करण्यात येणार आहे व 3 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली असून अहवाल प्रलंबित आहेत.
आज दिनांक 27 एप्रिल 2020 रोजी उदगीर येथील 30, अंबाजोगाई येथील 2 व या संस्थेतील 1 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी प्रक्रिया चालु आहे अशी माहिती डॉ. गिरीष ठाकुर अधिष्ठाता, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातुर यांनी दिली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
