Share

औरंगाबादकरांसाठी धोक्याची घंटा; तीन नवीन कोरोना रुग्णांची भर

Published On: 

औरंगाबाद : कोविड 19 चा संसर्ग झालेल्या तीन नवीन कोरोना रुग्णांची कोविड 19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यामुळे या आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 35 झाली असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले. तर जुन्या दोन रुग्णांची दुसरी चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे.

मिनी घाटीमध्ये एकूण 47 रुग्णांची आज तपासणी झाली. त्यापैकी 24 जणांना घरीच अलगिकरणात राहण्याचा सल्ला दिला. 36 जणांच्या लाळेचे नमुने घेऊन घाटीतील प्रयोगशाळा येथे पाठवण्यात आले आहे. 31 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 7 जणांचे अहवाल येणे बाकी आहे.

आताच्या नवीन तीन रुग्णांसाह मिनी घाटीमध्ये सध्या 15 कोरोनाबाधित रुग्णांवर विलगिकरण कक्षात, दोन कोरोना बाधितांवर घाटीमध्ये उपचार सुरू आहेत. तर देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्या 28 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, असे डॉ. कुलकर्णी म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!