Share

हिंगोलीत कोरोनाचे २७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण; जिल्ह्यात धरणे, सभा, आंदोलनांवर बंदी

Published On: 

🕒 1 min read

हिंगोली : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून एका आकड्यावरून आलेली कोरोना रुग्णावाढीची संख्या आता पुन्हा दोन अंकी झाली आहे. गेल्या आठवढ्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून शनिवारी एकाच दिवसात जिल्ह्यात २७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे आता जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

शनिवारी हिंगोली, वसमत, कळमनुरी, सेनगाव या ठिकाणी आरटीपीसीआर टेस्टमध्ये २७ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. यात हिंगोली परिसरातील २० सेनगावमधील ३ तर कळमुरीतील ४ जणांचा समावेश आहे. दरम्यान, शनिवारी ११ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे ३,८९१ रुग्ण आढळून आले आहेत. यातील ३,७४० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या हिंगोली जिल्ह्यात ९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात धरणे, सभा, आंदोलनांवर बंदी
हिंगोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी शनिवारी जिह्यात धरणे, सभा आणि आंदोलनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधिक्षक सर्व उपविभागिय अधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर साथरोग प्रतिबंध कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत हे निमय लागू राहणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!