सोलापूर : शहरात एका किराणा दुकानदाराच्या मृत्यू नंतर तो व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्या व्यक्ती मुले एका महिलेला व एका मुलाला कोरोनाची लागण झाली होती. तसेच या व्यतिरिक शहरातील खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आल्याने ९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
या सर्व कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी केली जात आहे. त्यातील २५ संशयितांची आज (शुक्रवारी) दुपारपर्यंत अहवाल निगेटिव्ह आले आहे. अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. तसेच इत्तर ९ संशयितांच्या अहवालाची प्रतीक्षा केली जात असल्याचेही ते म्हणाले.
आता पर्यंत शहरातील तेलंगी पाच्छा पेठ परिसरात एकूण १२ ककोरोना पॉसिटीव्ह सापडले आहेत. त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला असून इतर ११ रुग्णांवर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरात ४९४ जणांची चाचणी करून ४८५ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले आहे. त्यातील ४७३ संधिवातांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. व रुग्णाच्या संख्येत वाढ होऊ नये या साठी आवश्यक ती खबरदारी वैद्यकीय विभागाकडून घेतली जात आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

