Share

गुजरातमध्ये २४ नव्या मंत्र्यांचा शपथविधी; मंत्रिमंडळात रूपाणींच्या एकाही मंत्र्याला स्थान नाही

Published On: 

🕒 1 min read

गुजरात : गुजरातमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय चढाओढ बघायला मिळत आहे. भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज २४ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. महत्वाचे म्हणजे विजय रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला येथे स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे सर्वत्र नवीन चर्चांना उधाण आले आहे. यावेळी एकूण २४ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये १० जणांना कॅबिनेट मंत्रिपद, तसेच १४ जणांना राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळलेल्या माहितीनुसार नव्या मंत्रिमंडळाची पहिली मंत्रिमंडळ बैठक आज दुपारी ४.३० वाजता गांधीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. निमा आचार्य यांची विधानसभा स्पीकरपदी नियुक्ती झाली असून राजेंद्र त्रिवेदी यांनी पदाचा राजीनामा देत मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील २२ मंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला आहे. यात माजी उप मुख्यमंत्री नितीन पटेल यांचाही समावेश आहे. यामुळे पक्षातील अंतर्गत वाद समोर येण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!