कोकण: कोकणातला गणेशोत्सव आणि शिमगा जगप्रसिद्ध आहेत. तर, आता गणेशोत्सव अवघ्या १० दिवसांवर आला असून कोरोना संकटामुळे उद्भवलेल्या समस्यांवर मात करून चाकरमानी देखील आपापल्या गावी परतत आहेत. याच गणेशोत्सव काळात कोकणात वीज कपात गेली जाणार नसून अखंडीत वीज पुरवठा आता केला जाणार आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह संपूर्ण कोकणात २४ तास वीज पुरवठा केला जाईल. यासंदर्भात राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी याबाबत महावितरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले आहेत.
महावितरणच्या फोर्ट येथील कार्यालयात ऊर्जामंत्री डॉ. राऊत आणि खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत तसेच कोकण विभागातील विजेच्या कामांसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. कोकणात गणेशोत्सव मोठ्या स्वरुपात साजरा केला जातो. या कालावधीत रायगडप्रमाणे रत्नागिरी या ठिकाणी वीज कपात न करता 24 तास वीज पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले आहे.
राज्यात एका दिवसात कोरोनामुक्तांचा आकडा १० हजारां पार, तर नवे रुग्ण इतके…
तसेच रोहा येथे २२ केव्ही स्विचींग उपकेंद्र करण्यासंदर्भात 2 हजार 800 चौरस मीटरची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच श्रीवर्धन तालुक्यात अति उच्चदाब (ईएचव्ही) उपकेंद्र उभारल्यास दिघी बंदरासाठी ते फायदेशीर ठरू शकेल, असेही ते म्हणाले. रोहा तालुक्यामध्ये आरएसजे पोल्सची आवश्यकता आहे. तळा तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता सुरळीत वीज पुरवठ्यासाठी भौगोलिकदृष्ट्या मोठया शाखा कार्यालयाची विभागणी दोन शाखांमध्ये करण्यात यावी, असे नितीन राऊत यांनी सांगितले.
अनुसूचित जाती-जमातीचे पदोन्नतीचे आरक्षण कायम राहावे यासाठी पुण्यात निदर्शने


