🕒 1 min read
नवी दिल्ली : कोरोनाच्या दहशती खाली इराणमध्ये अडकलेल्या 234 भारतीय नागरिकांना सुखरुपपणे देशात आणण्यात आले आहे. यामध्ये 131 विद्यार्थी आणि 103 तीर्थ यात्रींचा समावेश आहे, याबाबत माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली.
परराष्ट्र मंत्री एस. जय शंकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. तसंच या २३६ जणांमध्ये १३१ विद्यार्थी आहेत असंही जयशंकर यांनी म्हटलं आहे. शुक्रवारी ४४ प्रवाशांना इराणहून भारतात आणलं गेलं. त्यानंतर आतापर्यंत एकूण २३६ भारतीयांना इराणहून भारतात आणण्यात आलं आहे.
तसेच इराण सरकार आणि भारतीय दुतावासाचे जयशंकर यांनी आभारही मानले. करोना व्हायरसमुळे इराणमध्ये १०० जणांचा मृत्यू झाला. तिथे गेलेले भारतीय हे मायदेशी परतण्याच्या चिंतेत होते. अखेर हे सर्व जण मायदेशी परतल्यामुळे चिंता गेली आहे.
234 Indians stranded in #Iran have arrived in India; including 131 students and 103 pilgrims.
Thank you Ambassador @dhamugaddam and @India_in_Iran team for your efforts. Thank Iranian authorities.— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) March 14, 2020
दरम्यान, इराणमध्ये शनिवारी कोरोणामुळे जवळपास 100 नागरिकांचा मृत्या झाला. याच बरोबर तेथील मृतांचा आकडा आता 700 वर पोहोचला आहे. येथे जवळपास 13 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

