Share

सरकारी, खाजगी बॅंकांनी आधार नोंदणी केंद्र सुरू न केल्यास २० हजार दंड

Published On: 

नवी दिल्ली : सरकारी व खाजगी क्षेत्रातील बॅंकांनी त्यांच्या १० टक्के शाखांमध्ये १ ऑक्टोबरपर्यंत आधार नोंदणी केंद्र सुरू केले नाही, तर २० हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असे आधार प्राधिकरणाने जाहीर केले आहे. अशी केंद्रे सुरू करण्यास मुदतवाढ देण्याबाबत बॅंकांनी केलेल्या विनंतीनुसार ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.

सर्व बॅंकांनी आपल्या प्रत्येक शाखेत आधार नोंदणी केंद्र सुरू करण्याचे निर्देश १३ जुलै रोजी देण्यात आले होते. त्यानुसार करूर वैश्य बॅंकेने १७ ऑगस्ट रोजी चेन्नईतील एका शाखेत केंद्र सुरू केले. यामुळे केंद्र सुरू करणारी करूर वैश्य बॅंक ही पहिली खाजगी बॅंक ठरली असल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!