Share

20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला विलक्षण चालना मिळेल : चंद्रकांत पाटील

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुन्हा देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी चौथ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. १८ मे पूर्वी हा लॉकडाऊन कसा असेल याची माहिती दिली जाईल अस मोदींनी सांगतिले. तर यावेळी मोदींनी भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी 20 लाख करोडचं आर्थिक पॅॅकेजही जारी केले आहे. मोदींच्या या भव्य पॅॅकेजचं राज्यातील भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले आहे.

त्यांनी ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वावलंबनासाठी आणि आर्थिक विकासासाठी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असून या ऐतिहासिक निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला विलक्षण चालना मिळेल, असे चंद्रकांत पाटील म्हंटल आहे. याबाबतचे पत्रक देखील चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्ध केले आहे.

दरम्यान मोदींनी 20 लाख करोडचं आर्थिक पॅॅकेज जाहीर करत देशात लॉकडाऊन वाढणार असल्याचे घोषित केले. यावरून कॉंग्रेसने पंतप्रधान मोदींना लक्ष्य करत टीका केली. आपण माध्यमांना हेडलाईन दिली पण गरिबांना हेल्पलाईनची गरज आहे, हे कधी देणार ? असा सवाल विचारण्यात आला आहे, कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत हा सवाल केला आहे.

पंतप्रधान मोदीजी, तुम्ही तुमच्या भाषणातून देशातील मीडियाला वृत्त छापण्यासाठी ‘हेडलाइन’ तर दिली, पण देशाला अद्यापही मदतीच्या ‘हेल्पलाइन’ची गरज आहे….घरी परतणाऱ्या मजूर, कामगार, गरिब वर्गातील नागरिकांना सर्वात प्रथम मदत मिळणे गरजेचं आहे… तुम्ही त्याबाबत काही घोषणा कराल अशी अपेक्षा होती… पण, देश आणि राष्ट्रनिर्मित्तीसाठी कार्यरत असलेल्या मजूर व श्रमिकांप्रति आपल्या निष्ठुरता आणि असंवेदनशीलतेमुळे निराश आहोत, असे ट्विट सुरजेवाला यांनी केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!