Share

अपघातग्रस्त ‘एएन ३२’ विमानातील सर्व १३ जवान शहीद

Published On: 

नवी दिल्ली : ३ जूनपासून भारतीय हवाई दलाचे एएन-३२ विमान बेपत्ता होते. या बेपत्ता विमानाचे अवशेष अरुणाचलमधील लिपोमध्ये सापडले होते. अपघातग्रस्त विमानाचे अवशेष मिळाल्याच्या ठिकाणी आज सकाळी १५ सदस्यीय बचाव पथक दाखल झाले होते. आता या विमानात असणारे सर्व १३ जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे.

मंगळवारी, भारतीय हवाई दलाच्या एएन ३२ या विमानाचे अवशेष सियांग जिल्ह्यात आढळून आले. अपघाताचे ठिकाण अतिशय उंचावर आणि घनदाट जंगलात आहे. त्यामुळे विमानाचे अवशेष असलेल्या ठिकाणी पोहचणे हे आव्हानात्मक काम होते. अपघातात ठार झालेल्या १३ जवानांमध्ये ६ अधिकारी आणि ७ एअरमन यांचा समावेश होता. अपघातग्रस्त विमानांच्या ठिकाणी पोहचण्यासाठी १५ सदस्यीय बचाव पथकाला हेलिड्रॉप करण्यात आले होते.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!