पुणे : माजी महापौर व नगरसेविका वैशाली बनकर व माजी नगरसेवक सुनिल बनकर यांच्या कुटुंबातील ९ जणांची कोराना टेस्ट पॅाझिटिव्ह आल्या आहेत. त्यांच्यावर येवलेवाडी येथील महापालिकेच्या कोरोना केअर सेंटरमध्ये ( सीसीसी) उपचार सुरू आहेत.
सुनिल बनकर यांची आई विमल दत्तानाना बनकर, चुलते विनायक व त्यांचा नातू राज बनकर, भाऊ सुधीर बनकर, भावजय सारीका बनकर, चुलत भाऊ राज सागर बनकर, भावजय पूनम संदेश बनकर, चुलत भाऊ सुमित बनकर, त्यांची ९ वर्षाची मुलगी देवयानी बनकर या ९ जणांची कोरोना टेस्ट पॅाझिटिव्ह आली आहे.
वैशाली बनकर व माजी नगरसेवक सुनिल बनकर राहत असलेल्या सातववाडी, गोंधळेनगर भागात कोरोनांच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. विविध प्रश्न सोडविण्यासाठी नागरिक त्यांच्या घरी व कार्यालयात रोज येत असतात. तसेच या भागातील नागरिकांच्या अंत्यविधीसाठी घरातील लोक जात असतात. त्यामुळेच कुटुंबातील नागरिकांना कोरोना झाला असल्याचा संशय बनकर यांनी व्यक्त केला.
राज्यातील हॉटेल सुरु करण्याबाबत लवकरच निर्णय, मुख्यमंत्र्यांचं मोठ पाऊल
दरम्यान, दुरीकडे कालच पुण्याचे प्रथम नागरिक महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता मोहोळ यांच्या कुटुंबातील आणखी आठ सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
या सर्व प्रकारामुळे महापौर मोहोळ यांच्यासह एकूण 9 जणांना कोरोना झाला आहे. या सर्वांना सामान्य लक्षणं आहे. दरम्यान कुटुंबातील इतर सदस्यांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहे. मोहोळ यांच्यावर देखील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला दाखवला ‘ठाकरी’ हिसका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
