पुणे: देशभरात कोरोनाने थैमान घातल्यापासूच मुंबई, पुण्यासह राज्यात रुग्णांची संख्या हि अजून वाढतच आहे. अशातच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. पुण्यात अधिकृत आकडेवारीनुसार कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ८७२ असली तरी, १ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा खुलासा मोहोळ यांनी केला आहे.
त्यांच्यामते असे जवळपास १ हजार नागरिक आहेत ज्यांचा मृत्यू कोरोनाचा अहवाल येण्याआधीच झाला आहे. तर, हे आकडे दर्शवले जात नाहीत. त्यामुळे याप्रकरणी चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी काल (३० जुलै) रोजी झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बैठकीत केली.“कोरोनाचा अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झालेल्यांची संख्या एक हजार आहे. हे एक हजार रुग्ण रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच किंवा दाखल झाल्यानंतर लगेच काही तासात मृत्युमुखी पडले आहेत.”, असा दावा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.
सामना अग्रलेख: फ्रान्सवरून आलेल्या राफेल विमानांपेक्षा ‘हे’ महत्त्वाचे आहे
तसेच, “प्रशासनाने हे मृत्यू लपवल्याचा आरोप नाही, मात्र याबाबत चौकशी करावी आणि अशाप्रकारे मृत्यू न होण्यासाठी कार्यवाही करण्याची गरज आहे”, असं मोहोळ यांनी सांगितले. यासंदर्भात टीव्ही ९ ने वृत्त दिले आहे.
महिलांबाबत गैरप्रकार खपवून घेणार नाही, यशोमती ठाकूर कडाडल्या
“ससून रुग्णालयात दररोज बारा आणि खासगी रुग्णालयात 50 रुग्णांचा मृत्यू होत आहे. दर महिन्याला चारशे पाचशे मृत्यू होतात, रुग्णाच्या क्ष किरण अहवालात रुग्णाला कोरोना संसर्ग झाल्याचे दिसून येते. यासंदर्भात ससून रुग्णालयाने, केंद्रीय समितीने पुष्टी दिल्याचा दावाही” महापौर यांनी केला आहे. “रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल मृत्यूनंतर येत असल्याने कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून दाखवलं जात नाही”, असंही मोहोळ यांनी या बैठकीत स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करा – नाना पटोले
तसेच, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगतानाच क्वारंटाईन सुविधांचे नेटके व्यवस्थापन करण्यासोबतच ट्रॅकींग आणि टेस्टींगही मोठ्या प्रमाणात कराव्यात. मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत तसेच ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. कोरोना विरुद्धचा लढा जिंकण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसोबतच प्रत्येकाने झोकून देत काम केले तर पुणे जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

