Share

‘जिरायतीसाठी १०, बागायतीसाठी १५ तर बहुवार्षिक पिकांसाठी मिळणार २५ हजार रुपये प्रति हेक्टर’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. अशा आपतग्रस्त शेतकऱ्यांना १० हजार कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज राज्य सरकारने जाहीर केले आहे. या माध्यमातून जिरायत जमिनी असलेल्या शेतकऱ्यांना १० हजार रुपये तर बागायती जमीन असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. तर मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हातचे पिक निघून गेले. या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वरील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना, दिलासा मिळाला आहे.

या संदर्भात महसूल मंत्री बाळासोब थाेरात यांनी सांगितले की, ‘राज्यात जून ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेला शेतक-यांना १० हजार कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असून जिरायतसाठी १० हजार, बागायतीसाठी १५ हजार, व बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रु. प्रति हेक्टर मदत देण्यात येणार आहे.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!