Share

उस्मानाबाद जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : नवीन सरकारने महात्मा जोतिराव फुले यांच्या नावाने कर्जमुक्ती योजना जाहीर केल्याने शेतकऱ्यांन मधून समाधान व्यक्त होत आहे. या योजनेचा जिल्ह्यातील साधारण दीड लाख शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची  शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांचा यात समावेश केल्यास हा आकडा दुप्पट म्हणजे तीन लाखांच्या घरात जाईल, असे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यास साधारण नव्या कर्जमाफीसाठी साडेसातशे ते एक हजार कोटींपर्यंतच्या रकमेची गरज लागेल, असा प्राथमिक अंदाज समोर येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला होता. अर्ज केलेले जवळपास 80 हजार शेतकरी यात अपात्र ठरले होते. त्यांनाही या कर्जयोजनेमध्ये लाभ मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

सप्टेंबरपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे. 2015 पासून कर्जाची परतफेड करता आली नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. यापूर्वीच्या कर्जमाफी योजनेमध्ये जुलै 2017 पर्यंत शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला होता. मात्र त्यानंतर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती अधिक भयंकर झाली होती. साहजिकच त्या काळात अधिक शेतकरी कर्जबाजारी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे जे शेतकरी कर्ज भरू शकले नाहीत, त्यांना या कर्जमाफी योजनेने मोठा दिलासा मिळणार असल्याचे निश्चित आहे.

गेल्या वेळी कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रीयीकृत बॅंकांची माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. साहजिकच शेतकऱ्यांना लाभ मिळणार का, याविषयी शंका निर्माण झाल्या होत्या. वारंवार सूचना देऊनही बॅंकांनी सहकार्य केले नसल्याचे निदर्शनास आले. यंदा यात सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करण्याची मागणी आतापासून जोर धरू लागली आहे.

महत्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1209046768039555072?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!