उस्मानाबाद : राज्यातील इतर शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाचं उस्मानाबाद जिल्ह्याने कोरोनावर मात केली आहे. आज उस्मानाबाद जिल्हा हा कोरोनामुक्त जिल्हा असल्याचे जाहीर करण्यात आले.
उस्मानाबादमध्ये ३ जणांचा कोरोनाची लागण झाली होती. यानंतर या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ८५ लोकांची देखील कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती. मात्र या सर्व लोकांचे चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता.
तसेच रविवारी जिल्ह्यातील ३ कोरोनाबाधित रुग्णांचे उपचारानंतरचे शेवटचे अहवाल देखील निगेटिव्ह आल्यामुळे उस्मानाबाद जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. तसेच जिल्हा प्रशासनातर्फे देखील उस्मानाबाद जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या देशात झपाट्याने वाढत आहे. अशातच रविवारी एकाच दिवसात देशभरात १ हजार ६१२ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये राज्यात ५५२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची रविवारी नोंद झाली. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची ४२०० वर पोहचली आहे.
तर जगातही कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 24,06,823 वर पोहोचली आहे. 1,65,054 लोकांचा मृत्यू झाला आहे. वेबसाइट वल्डोमीटरने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेमध्ये 763,832, स्पेनमध्ये 198,674, इटलीमध्ये 178,972, फ्रान्समध्ये 152,894 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
…अस झालं तर उद्धव ठाकरेंना द्यावा लागणार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा | Can CM Gives His Resign ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

