Share

कोकणातील ‘या’ दिग्गज नेत्याच्या गळ्यात पडणार विधानपरिषदेची माळ?

Published On: 

विवेक पोटफोडे | रायगड: विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस तर्फे कोकणातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस माजी आमदार माणिकराव जगताप यांना संधी दिल्यास रायगड जिल्ह्यात तसेच कोकणात कांग्रेसला पुन्हा एकदा अच्छे दिन येऊ शकतात असा ठाम विश्वास काँग्रेस कार्यकर्त्ते व्यक्त करत आहेत.तशा प्रकारची मागणी अनेकदा पक्षाच्या बैठकीत करण्यात आली आहे, काँगेसला कोकणात नवे उमदे नेतृत्व देण्याची क्षमता म्हणून माणिकराव जगताप यांच्याकडे पाहीले जाते.

तसेच रायगड जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नसला तरी प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढविण्याची विश्वास माणिकराव जगताप यांनी अनेकदा आपल्या मुलाखतीतून व्यक्त केला आहे.

विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीला पाच तर भाजपला चार जागा मिळणार असल्यानं विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी होणारी निवडणूक बिनविरोधच पार पडेल, अशी चिन्हं आहेत. भाजपने तसे संकेत आधीच दिले आहेत. मात्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या सहा जागा निवडून येतील, असा दावा केला आहे.

आमच्याकडे असलेलं संख्याबळ पाहता सहा जागा निवडून शकतात. त्यात कोणतीही अडचण येणार नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून येतील, असं थोरात म्हणाले. या संदर्भात लवकरच तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होईल, असंदेखील त्यांनी सांगितलं.

दरम्यान महाआघाडीत असलेल्या कॉंग्रेसकडून जगताप यांना काँग्रेसचा कोकणचा एक अभ्यासू चेहरा म्हणून संधी देण्यात येईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!