Share

सरकारवर नाराजी व्यक्त करत ‘या’ भाजप नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Published On: 

नवी दिल्ली : कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास सरकार अयशस्वी ठरत आहे, असे म्हणत एका भाजप नेत्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लडाखच्या भाजप प्रदेशाध्यक्ष छीरिंग दोरजे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, तर सध्याची परिस्थिती हाताळण्यात सरकार अयशस्वी ठरत असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.

छीरिंग दोरजे म्हणाले कि, लडाखमधील २०,००० पेक्षा जास्त लोक देशभरात अडकले आहेत, परंतु लडाख प्रशासन त्यांना परत आणण्यात अपयशी ठरले आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना आणण्याच्या प्रशासनाची वृत्ती असंवेदनशील राहिली आहे, असे त्यांनी म्हंटले आहे. यासंदर्भात छीरिंग दोरजे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना पत्र लिहिले आहे.

देशभर अडकलेल्या लडाखच्या लोकांची परिस्थितीविषयाची संपूर्ण माहिती उच्च अधिकाऱ्यांना दिली होती. त्यांनी याबाबत राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना यांनाही माहिती दिली होती. पण परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. अखेर छीरिंग दोरजे यांनी पदाचा राजीनामा देत नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, लडाखमध्ये करोना विषाणूचा संसर्ग वाढतच असून करोना रूग्णांची संख्या ४१ झाली आहे. तर करोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असून याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि सर्वच राज्य सरकार आवश्यक ती पाऊले उचलत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!