🕒 1 min read
नागपूर: सरकारचे शिक्षणासंदर्भातील किती दुटप्पी आणि उदासिन धोरण आहे हे लक्षात आले. राज्यातील १३०० च्यावर शाळा बंद करण्याचा डाव शिक्षणमंत्र्यांनी चालू केला आहे. विनाअनुदानित शाळांचे अनुदान सुरु करण्याबाबतीत हे सरकार सकारात्मक नाही. मग प्राथमिक शिक्षण असो,माध्यमिक असो किंवा कनिष्ठ महाविदयालय असो एकंदरीतच सर्व महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचे पूर्ण वाटोळे झालेले आहे. आणि याला राज्याचे शिक्षणमंत्री जबाबदार आहेत असा आरोप करतानाच यासंदर्भात उत्तर देताना कोणतेही ठोस उत्तर मंत्र्यांना देता आले नाही. आणि जे उत्तर दिले तेसुध्दा सत्तेच्या मस्तीमध्ये दिले आणि म्हणून विधानपरिषदेमध्ये शिक्षणासंदर्भात सरकारच्याविरोधात बहिष्कार आम्ही टाकला असे विधान परिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे हे पत्रकारांशी बोलतांना म्हणाले.
१३०० मराठी शाळा बंद करून गोरगरीब मराठी मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा @TawdeVinod यांचा घाट आहे, विनाअनुदानित शाळांना अनुदानासाठी शासन अनुकूल नाही. हा विषय आज आम्ही सभागृहात मांडला. शासनाच्या या शिक्षण आणि शिक्षकविरोधी भूमिकेचा निषेध करत सभात्याग केला… pic.twitter.com/PXbdMfofeR
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 14, 2017
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
