🕒 1 min read
नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनाच्या संसर्गाने अनेकांनी आपला जीव गमावला आहे. त्या लोकांना आदरांजली वाहण्यासाठी जगभरातील आवडत्या पबजी कंपनीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरस विरुद्ध लढताना ज्या लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आज मध्यरात्री १२ वाजेपासून उद्या रात्री १२ पर्यंत पबजीचे शटडाऊन असणार आहे.
भारतासह संपूर्ण जगभरात पबजीचे लाखो चाहते आहेत. २०१९ पासून अनेक तरुणांनी पबजीच्या खेळापायी खाणे-पिणे सोडल्याच्या घटना समोर अल्यालेया आपण पहिल्या आहेत. परंतु, पबजी प्रेमींसाठी ही बॅड न्यूजच म्हणायला हवी. जगभरात पबजी २४ तास बंद राहणार असल्याची माहिती कंपनीने स्वतः युजर्संना नोटिफिकेशन पाठवून दिली आहे. त्यामुळे पबजीच्या चाहत्यांना २४ तास पबजी गेम खेळता येणार नाही. पबजीची ही माहिती आपल्या युजर्संना कळावी यासाठी कंपनीकडून युजर्संना ‘Temporary Suspension of Service’ असे नोटिफिकेशन पाठवले जात आहे.
सध्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जगभरात हजारो जणांचा बळी गेला आहे. तर लाखो लोकांना करोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. चीनमध्ये एका शहरात आलेला करोना व्हायरस आज जगाच्या अनेक काना कोपऱ्यात पोहोचला आहे. करोना विरुद्ध लढण्यासाठी सर्वच स्तरांतून प्रयत्न केले जात आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
