Share

आमच्या नादाला लागू नका, नाद खुळा करीन – प्रताप ढाकणे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार पारदर्शक पध्दतीने अतिशय उत्तमरीत्या चालू असून जनतेने आम्हाला सत्ता दिली त्याच्या वेदना आजही विरोधकांना होत असून सगळया संस्था आम्हालाच पाहीजेत, राजकारण टिकले पाहीजे ही विरोघकांची भूमीका आहे. त्यामुळे ते विनाकारण आम्हाला बदनाम करीत आहेत. विरोधकांकडून आम्हाला जाणीवपूर्वक त्रास देऊन बदनाम केले जात आहे असा आरोप केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी विरोधकांवर नाव न घेता केले.

पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीला समितीविरूध्द जे सत्याग्रहाला बसले त्यांनीच अतिक्रमण केले आहे. केलेले अतिक्रमण जिरले पाहिजे यासाठी त्यांचा खटाटोप सुरू आहे. तुमच्या ताब्यात असलेल्या संस्था कशा पघ्दतीने चालतात हे अगोदर पहा, आमच्या नादाला लागू नका, नाद खुळा करीन अशा शब्दात प्रताप ढाकणे यांनी विरोधकांना सुनावले. चार दिवसापूर्वी  बाजार समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत सहाय्यक निबंघक कार्यालयात बैठा सत्याग्रह केला होता. त्या पार्श्वभूमीवर ढाकणे पत्रकारांशी बोलत होते. कृषी उत्पन्न बाजार समिती आमच्या ताब्यात आली त्यावेळी १२ लाख रूपये तोटा होता त्यानंतर आवश्यक २७ लाख रूपये खर्च करून ३१ मार्च १८ अखेर बाजार समितीला १ कोटी १४ लाख रूपयांचा नफा झाला असेही ढाकणे म्हणाले.

राजकारण जरूर करा, तुमच्या पध्दतीने करा, परंतु संस्था टिकल्या पाहीजेत ही आमची भूमीका आहे. अनेक कारखाने विकलेत, परंतु केदारेश्वर नाही विकला. आम्हाला प्रचंड त्रास झाला, परंतु आम्ही ठाम राहीलो. तुमच्या ताब्यात असलेला वृध्देश्वर कारखाना मागील वर्षी थकबाकीत होता. तुमच्या ताब्यात असलेल्या खरेदी विक्री संघात भ्रष्टाचार सिध्द झाला मग गुन्हा का दाखल करीत नाही. आमदार आहात म्हणून दबाब टाकता. तुमच्या समर्थकांचे अतिक्रमण अगोदर काढा. श्रमदान आम्हीही केले, परंतु आम्ही प्रसिध्दीपासून दूर राहिलो, असा टोला ढाकणे यांनी लगावला. ढाकणे म्हणाले की, तिसगावमधील गाळे वाटपाबाबत आमच्यावर आरोप केले, परंतु त्या ठिकाणचा एकही गाळा दिलेला नाही. पाथर्डी येथील फक्त दोन भूखंड दिले असून ते ले-आउट मध्ये आहेत. कोणतेही बेकायदेशीर काम बाजार समितीकडून झालेले नाही. आमची सीबीआय चौकशी करा, त्या चौकशीला सामोरे जायला आम्ही तयार आहोत. जे सत्याग्रहाला बसले होते ते रात्री आम्हाला फोन करून सांगत आहेत की आम्हाला आदेश देण्यात आले होते, बदनाम करा असे सांगितले, आम्ही नाईलाजास्तव सत्याग्रहाला बसलो.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!