Share

आजपासून बँक कर्मचारी संपावर; नोकरदार वर्गाची चिंता वाढली

Published On: 

मुंबई – राष्ट्रीयकृत बँकांचे कर्मचारी आजपासून 2 दिवसांच्या संपावर आहेत. बँक कर्मचाऱ्यांनी ऐन महिना अखेरला संप पुकारल्याने पगार लांबणीवर पडण्याच्या शक्यतेने, नोकरदार वर्गाची चिंता वाढली आहे. तसंच एटीएममध्येही खडखडाट निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. राष्ट्रीयकृत बँकांच्या वेगवेगळ्या 9 कर्मचारी संघटनांचे 10 लाख कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे त्याचा मोठा परिणाम सर्वसामान्यांवर आणि आर्थिक व्यवहारावर पहायला मिळणार आहे.

इंडियन बँक असोसिएशनने प्रस्तावित केलेल्या २ टक्के पगारवाढीचा निषेध म्हणून संपाची हाक देण्यात आली आहे. दरम्यान मागच्या वेळी बँक कर्मचाऱ्यांना जवळपास १५ टक्के पगारवाढ देण्यात आली होती. केंद्रीय कामगार आयुक्तांनी मध्यस्थी करत संप होऊ नये यासाठी खटाटोप केला खरा, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नसल्याने बँक कर्मचारी आजपासून २ दिवसांच्या संपावर जाणार आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!