Share

अडवाणींना अडवणारा ‘तो’ जिल्हाधिकारी आता मोदींच्या मंत्रिमंडळात

Published On: 

🕒 1 min read

वेबटीम : २०१९ ला समोर ठेऊन नरेंद्र मोदी यांनी आपली नवी टीम तयार केली आहे. या १३ जणांच्या टीम मध्ये मोदींने ४ माजी अधिकाऱ्यांना संधी दिली आहे. या मध्ये एक असा अधिकारी आहे की ज्याने थेट लालकृष्ण अडवाणी यांची १९९० साली निघालेली रथयात्रा रोखली होती. या डॅशिंग अधिकाऱ्याच नाव होत आर. के. सिंह. आर. के. सिंह त्यावेळी बिहार मधील समस्तीपूरचे जिल्हाधिकारी होते.
बिहारमधील आरा मतदारसंघातून खासदार असलेल्या आर. के. सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर १९९० च्या त्या घटनेच्या आठवनींना पुन्हा उजाळा उजाळा मिळाला आहे.

काय होती घटना ?
तारीख होती ३० ऑक्टोबर 1990. त्यावेळी लालकृष्ण आडवाणी यांची रथयात्रा सुरु होती, संपूर्ण देशात वातावरण आडवाणी यांच्या बाजूने झुकलेले होते. जी यात्रा देशाचे राजकारण बतलत होती तिला थोपवण मोठ जिकिरीच काम होत. त्यावेळी अडवाणी सोमनाथहून रथ घेऊन आयोध्याला जात होते. देशातील वातावरण तापलेले होते. अशात आडवाणींना अटक करणे म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर जाणार होती , पण अस असताना देखील त्यांना बिहारमध्ये अटक करण्यात आली. अडवाणी यांना अटक करुन तुरुंगाची वाट दाखवणारा दुसरा-तिसरा कुणी नव्हता, तर ते होते आर. के. सिंह. त्यावेळी आर. के. सिंह हे समस्तीपूरचे जिल्हाधिकारी होते. अडवानी यांना अटक करून आर. के. सिंह. यानी त्यांना रांचीच्या तुरुंगात पाठवले होते.

अशाप्रकारे लालकृष्ण आडवाणी यांची रथ यात्रा आर. के. सिंह यांनी आयोध्यात जाण्यापासून रोखली होती. ती यात्रा जर त्यावेळी आयोध्यात पोहचली असती देशात अघटीत घडलच असत पण या डॅशिंग अधिकाऱ्याने आपली कार्यतत्परता दाखवत अडवानींना अटक केली होती.

आर. के. सिंह हे 1975 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत आणि यूपीए सरकारच्या कार्यकाळात त्यांनी केंद्रीय गृहसचिवपदही भूषवलं आहे. याच पदावरुन ते निवृत्त झाले. पी. चिदंबरम यांच्या पसंतीमुळेच त्यांना गृहसचिव बनवलं गेल्याचं म्हटलं जातं. आर. के. सिंह हे सेंट स्टीफन्स कॉलेजचे विद्यार्थी आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!