Share

युवा आमदाराचा थेट शरद पवारांना ‘हा’ सवाल! म्हणाले लवासा बांधून शेतकऱ्यांच्या…

Published On: 

माळशिरस: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजन पार पडणार असून, याची तारीखही समोर आली आहे. दरम्यान, दुसरीकडे देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. “राम मंदिर बांधून करोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा,” असा टोला शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला होता. तर यानंतर शरद पवारांवर अनेकांनी टीकेची झोड उठवली असल्याचे दिसून आले.

अनेक भाजपा आमदारांनी राम जन्मभुमी हा अस्मितेचा प्रश्न असल्याचे सांगितले होते. यावर आता भाजपाचे युवा आमदार राम सातपुते यांनी देखील ट्विट करत कोरोना व राममंदिराचा काय संबंध जोडत आहात, अशा शब्दांत शरद पवारांच्या वक्तव्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. राम सातपुते यांनी, ‘ पवार साहेब म्हणत आहेत राममंदिर बांधून कोरोना जाणार नाही .. पण लवासा बांधून शेतकर्याच्या आत्महत्या थांबल्या का ?,’ असा सवालही त्यांनी विचारला.

‘महाविकास आघाडीचं सरकार अमर, अकबर अँथनीचं सरकार; पायात पाय घालून आपोआपच पडेल’

तसेच, ‘बारामती चा विकास झाला  म्हणजे मराठवाड्याचा विकास झाला का? राम मंदिर कोरोना चा संबंध कसा काय जोडत आहात आपण ….?  साहेब जय श्रीराम,’ असे ट्विट करत त्यांनी थेट शरद पवारांच्या वक्तव्यावर घणागात केला आहे. तर याआधी भाजपाच्या अनेक नेत्यांनी यावर भाष्य केले होते.

राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग प्रिया बेर्डे पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीचा पक्षात प्रवेश

भाजपाचे नेते निलेश राणेंनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधत शरद पवार यांना सल्ला देखील दिला होता. निलेश राणे म्हणतात, ‘ राज्यातील १३०० डॉक्टर आंदोलन करणार आहेत. नोकरीत कायम न केल्यामुळे डॉक्टरांची नाराजी आहे. राम मंदिरचा विषय काढून हिंदूंना डिवचण्यापेक्षा पवार साहेबांनी राज्य सरकारवर लक्ष द्यावे. राज्य सरकारने अगोदरपासून गंभीरतेने घेतलं असतं तर महाराष्ट्र ह्या संकटात देशामध्ये १ नंबर नसता.’

‘उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राममंदिरच्या पायाभरणीसाठी प्रमाणपत्र घ्यावे लागेल’

दरम्यान, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन सोहळा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह निवडक ३०० जणांना निमंत्रण पाठवण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंचे नाव आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!