Share

राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग प्रिया बेर्डे पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीचा पक्षात प्रवेश

Published On: 

मुंबई : राज्यासह देशात कोरोनाने थैमान घातले आहे. मात्र राजकीय पक्ष मात्र राजकारण करण्यात दंग असल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेली गळती आता सत्तेत आल्यावर भरून निघताना दिसत आहे. कारण राष्ट्रवादी मध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पक्ष प्रवेश सुरु आहेत. प्रख्यात चित्रपट अभिनेत्री सविता मालपेकर राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधणार आहेत. अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यापाठोपाठ सविता मालपेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.

सविता मालपेकर यांच्यासोबत गीतकार आणि अभिनेते बाबा सौदागर, प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना नेवरेकरही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतील. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत लवकर त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली.

‘मुंबईतील कोरोना प्रतिबंधाचे जगाकडून कौतुक; आता आणखी कसोटी, गाफील राहू नका’

अभिनेत्री सविता मालपेकर यांनी 1988 मध्ये ‘आई पाहिजे’ चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. ‘गाढवाचं लग्न’ या नाटकातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. ‘काकस्पर्श’ सिनेमात आत्याच्या भूमिकेसाठी त्यांनी डोक्यावरील संपूर्ण केस काढले होते. याशिवाय त्यांनी अनेक मराठी नाटक-मालिकांमध्येही भूमिका केल्या आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी माजी सनदी अधिकारी व अखिल भारतीय आदिवासी हलबा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय वसंतराव धार्मिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. ३७ वर्षांहून अधिक प्रशासकीय अनुभव, विविध विभागात काम केल्याचा अनुभव मला आहे. आपल्या पक्षात काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी आदरणीय खा. शरद पवार साहेबांचे आभार मानतो. माझ्या अनुभवाचा , कार्याचा पक्षाला उपयोग होईल अशी आशा बाळगतो, अशा शब्दांत धार्मिक यांनी आपले यावेळी मनोगत व्यक्त केले.

रूग्णसंख्या दुप्पट झाल्याने धुळ्यात चार दिवस कठोर टाळेबंदी

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!