Share

Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकर यांनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंचा गाजलेला ‘तो’ किस्सा

Published On: 

अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभेनं अकोल्यात कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात बोलताना  वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहेत. यासंदर्भात त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक गाजलेला किस्सा सांगितला आहे.

“राजकीय वैर न ठेवता मनाचा मोठेपणा दाखवण्याचं जे मोठेपण बाळासाहेब ठाकरेंमध्ये होतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये नाही”, असं म्हणत बाळासाहेब ठाकरे यांचा एक गाजलेला किस्सा प्रकाश आंबेडकर यांनी सांगितला आहे. दादू इंदुरीकरांचं गाढवाचं लग्न हे नाटक तेव्हा चर्चेत आलं होत. या नाटकांमध्ये इंदुरीकरांनी काही देवतांची टिंगल उडवली होती. त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी ही टिंगल उडवली होती. यामुळे तुमचे नाटक होवू देणार नाही, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना दिले होते. यावर माझे नाटक बघायला या आणि ते मला बंद करून दाखवा असं आव्हाहन दादू इंदुरीकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी दिल होतं.

बाळासाहेब ठाकरे इंदुरीकरांच्या नाटकाला गेले. त्या नाटकामध्ये इंदुरीकर म्हणाले, आज माझ्या सोबत ढाण्या वाघ बसलेला आहे. त्यानंतर बाळ ठाकरे उठले आणि दादू इंदुरीकरांना मिठी मारली आणि हे वाक्य सगळ्या शोमध्ये झाले पाहिजे. हा माझा तुला असणारा अधिकार आहे, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. हा दिलदारपणा मोदींमध्ये आहे का, शरद पवारांमध्ये आहे का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना केला.

“तुम्ही  लोकशाहीचे नेते आहात. त्यामुळे तुमच्यावर कोणीतरी टीका करत राहणार. सहन करा. पण आता मात्र यांना वाटलं कि त्याला पंधरा दिवस, महिनाभर आतमध्ये टाकतात. याला लोकशाही म्हणत नाहीत. याला दादागीरी म्हणतात. याला हुकूमशाही म्हणतात.” असं म्हणत आंबेडकर यांनी शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. या हुकूमशाहीच्या विरोधात आपल्याला लढायचे आहे आणि आपण लढत राहू, असं देखील प्रकाश आंबेडकर यावेळी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!